जलसंपदा विभागातील मयत शिपाई गणेश बनसोडे यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याचे आश्वासन


दैनिक स्थैर्य । दि. २० मे २०२२ । फलटण । कार्यकारी अभियंता, खारभूमी सर्वेक्षण विभागातील शिपाई पदावर सलग २० वर्षे नोकरी केलेल्या कै. गणेश बबन बनसोडे यांच्या कुटुंबीयांना निवृत्ती वेतन, गट विमा योजना रक्कम आणि अन्य उपदाने मिळण्याची मागणी करणारे निवेदन आहेरवाडी, इस्लामपूर येथे जलसंपदा मंत्री ना. जयवंत पाटील यांना देण्यात आले असून त्याबाबत योग्य न्याय देण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले आहे.

मंत्री महोदयांना निवेदन देवून सदर प्रकरणातील शिपाई यांचे निधन झाल्यापासून त्यांची पत्नी श्रीमती मिलन गणेश बनसोडे ह्या गेली १०/११ वर्षे संबंधीत कार्यालयाकडे निवृत्ती वेतन व मागण्यांसाठी सतत प्रयत्नशील असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर मंत्री ना. जयंत पाटील यांनी सदर निवेदन जलसंपदा विभागात पाठवून हे प्रश्न मार्गी लावण्याचे आणि मयत गणेश बनसोडे यांचे निवृत्ती वेतन व अन्य लाभ त्यांच्या पत्नी श्रीमती मिलन बनसोडे यांना मिळतील यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री यांनी दिले आहे.

मंत्री महोदयांना निवेदन देताना आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष राजू मारुडा, जिल्हा सचिव विजय येवले, फलटण तालुकाध्यक्ष संजय निकाळजे, उपाध्यक्ष सतीश अहिवळे, श्रीमती मिलन बनसोडे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!