
थेट WhatsApp वर मिळवा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबाबत लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता वाढली असून, आगामी काळात दोन महिन्यांची रक्कम एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १२ नोव्हेंबर : महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात आगामी काळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. राज्य सरकारने यापूर्वी सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरीत केला असला, तरी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांच्या अनुदानाचा प्रश्न अजूनही कायम आहे.
सध्याच्या स्थितीनुसार नोव्हेंबर अखेरपर्यंत किंवा डिसेंबर महिन्यात मागील प्रलंबित हप्ते अदा केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर नोव्हेंबर महिन्यामध्ये रक्कम जमा झाली नाही, तर डिसेंबर महिन्यात दोन महिन्यांचे मिळून एकत्रितपणे ३ हजार रुपये थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाऊ शकतात.
शासनाकडून अधिकृत घोषणा बाकी
योजनेच्या अंतर्गत दोन महिन्यांचे पैसे एकत्रित मिळण्याबाबत सोशल मीडियावर विविध अंदाज व्यक्त केले जात असले, तरी शासन किंवा महिला व बालविकास विभागाकडून याबाबत कोणतीही अंतिम व अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिलांनी केवळ शासनाच्या अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





