
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण, दि. २९ नोव्हेंबर : प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप उमेदवार कु. सिद्धाली अनुप शहा यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांना आवाहन केले आहे. महिलांना व्यासपीठ, शासकीय योजनांचा लाभ आणि नागरि सुविधा या तीन गोष्टींवर आपल्याला ठोस काम करायचे आहे, असे त्यांनी सांगितले.
सिद्धाली शहा यांनी मतदारांना सांगितले की, ही कामे याआधीही आपण केलेलीच आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुभवावर विश्वास ठेवून त्यांना संधी द्यावी.
रणजितसिंह नाईक निंबाळकर, ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर आणि समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या समर्थ नेतृत्त्वात हे सर्व शक्य आहे. त्यामुळे भाजपला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
एकंदरीत, सिद्धाली शहा यांनी महिला विकास, अनुभव आणि नेतृत्वाचे पाठबळ यावर भर दिला आहे.
