दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑगस्ट २०२४ | फलटण |
जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात यांच्या प्रेरणेतून फलटणजवळ पालखी महामार्गावर १५०० वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. क्रशर समितीच्या माध्यमातून तसेच आर. के. सी. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या सहकार्यांनी हे वृक्षरोपण पार पडले.
फलटण तालुका क्रशर संघटनेचे अध्यक्ष नंदू नाळे, उपाध्यक्ष संजय गाढवे, सदस्य रासकर भाऊ, नंदकुमार ठोंबरे, दिलीप शिंदे सर, दिलीप राऊत, महेश भोसले, वसीम शेख, सुधीर शहा, अनिकेत भोईटे, तसेच आर.के.सी. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा स्टाफ व प्रोजेक्ट मॅनेजर साईराज पाटील, नितीन तालोकर, के. के. पाटीदार इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. १५०० वृक्ष ज्यामध्ये वड, पिंपळ, लिंब अशा प्रकारचे तांबमळा, वडजल, निंभोरे येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी फलटण तालुका क्रशर संघटनेने या सर्व झाडांचे वृक्षारोपणासह संगोपन करण्याची जबाबदारी घेतली. या वृक्षारोपण कार्यक्रमकरीता आवश्यक असणारी १५०० वृक्षांची रोपे जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात यांनी वनविभाग रोपवाटिकांमधून उपलब्ध करून दिली.