फलटणच्या विरेंद्र गुंजवटेची आंतर विद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेच्या कर्णधारपदी निवड


दैनिक स्थैर्य । दि.३० डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषी महाविद्यालय फलटणचा विद्यार्थी कु. वीरेंद्र गुंजवटे याची राजीव गांधी प्रुद्योगिकी, भोपाळ येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या संघात कर्णधारपदी निवड झाली आहे.

या निवडीबद्दल विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, अधीक्षक श्रीकांत फडतरे, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर यांच्यासह सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारी यांनी या निवडीबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!