सौ. विणाताई पंडीत यांना शारदा पुरस्कार जाहीर


दैनिक स्थैर्य । दि.३० डिसेंबर २०२१ । फलटण । अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या वतीने देण्यात येणारा शारदा पुरस्कार या वर्षी येथील खंडाळा डॉ. सौ. वीणाताई बाळकृष्ण पंडित यांना जाहीर करण्यात आलेला आहे.

दर वर्षी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था फलटण यांच्या तर्फे शारदा पुरस्कार देण्यात येतो. या वर्षी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सौ. वीणाताई पंडित यांना रविवार दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 5:30 वाजता नवलबाई मंगल कार्यालय येथे समारंभ पूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास अध्यक्षा सौ. शिल्पा शरद इनामदार तर प्रमुख अतिथी म्हणून सौ. चारूलता विजय उपळेकर उपस्थित राहणार आहेत. हा पुरस्कार लेले कुटुंबियांकडून कै. सत्यभामाबाई वा. लेले याचे स्मरणार्थ देण्यात येतो.

या समारंभास सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन फलटण केंद्र प्रमुख विजय ताथवडकर यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!