फलटणची पौर्णिमा अंबरगे ठरली Miss India Elite 2024; डोक्यावर सजला सुंदर ‘हिर्‍यांचा क्राऊन’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ५ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फलटणच्या पौर्णिमा अंबरगे हिने Miss India Elite 2024 विजेतेपद मिळविले आहे. या विजेतेपदाने पौर्णिमेच्या डोक्यावर सुंदर असा ‘हिर्‍यांचा क्राऊन’ सजला होता.

एखाद्या सामान्य कुटुंबातील मुलगी प्रेरणा घेऊन शिकून ठरवलं तर काय करू शकते, याचं पौर्णिमा अंबरगे हे उत्तम उदाहरण आहे.

पौर्णिमा हिने २०२२ सारी Miss Phaltan हा किताब जिंकला होता, पण एवढ्यावरच न थांबता आपली जिद्द, कष्टाने आणि सतत शिकण्याच्या धडपडी वृत्तीमुळे पौर्णिमा आता हळूहळू अ‍ॅक्टींग, मॉडलिंगमध्ये आपलं करिअर उंचावत आहे.

हेच सातत्य टिकवत तिने यावर्षीचा Miss India Elite 2024 हा किताब आपल्या नावावर केला, याचा फलटणकरांना नक्कीच अभिमान असेल. मॉडलिंग, अ‍ॅक्टींग यासोबत तिने शिक्षणही चालू ठेवले आहे. ती आता एम.एस्सी.च्या दुसर्‍या वर्षाला शिक्षण घेत असून ‘डायट अँड न्युट्रिशियन’चा कोर्स देखील करत आहे.

या सर्व मेहनतीसाठी तिला आई-वडिलांचा आशिर्वाद आणि सहकार्य लाभले आहे. मॉडलिंग व अ‍ॅक्टिंगचे धडे ती नृत्यकला अकॅडमी, फलटण येथे घेत आहे. नृत्यासोबत अ‍ॅक्टींग, मॉडलिंग यांचेही प्रशिक्षण अकॅडमी देत असते.

सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या आणि खेळामध्ये फलटणचे नाव उज्ज्वल आहेच, पण कलाक्षेत्रातही फलटणचे नाव अजून गर्वाने, अभिमानाने गाजावे हीच नृत्यकला अकॅडमीची अपेक्षा आहे आणि यासाठी मुंबई-पुणेमधील मोठ-मोठ्या स्पर्धेला अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असतो.

या विजेतेपदाबद्दल पौर्णिमा हिचे सर्व स्तरावरून फलटणकरांकडून कौतुक होत आहे.

आमदार दीपक चव्हाण व जि. प.चे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!