
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२२ । फलटण । फलटणचे युवा उद्योजक असलेल्या सत्यजित घोरपडे यांच्या कन्या कु. देविका घोरपडे हीने चेन्नई येथे मुले व मुलींच्या युथ बॉक्सींग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये कु. देविका सत्यजित घोरपडे हीने ५२ किलो वजनी गटामध्ये सर्वोत्तम बॉक्सर हा किताब मिळवत सुवर्णपदक सुध्दा पटकावले.

या स्पर्धेत अंतिम झालेल्या सामन्यामध्ये हरियाणाच्या कु. अंजलीवर ५ – ० असा विजय मिळवत प्रतिस्पर्ध्याला एकही गुण पटकावू दिला नाही. यापुर्वी केरळ, आंद्रप्रदेश, कर्नाटक व पंजाबच्या खेळाडूंचा पराभव कु. देविकाने केला. गतवर्षी झालेल्या स्पर्धेत सुध्दा राष्ट्रीय विजेत पदक कु. देविकाने पटकावले होते.
