आई-वडिलांचा संघर्ष समजला तर जग जिंकण्याचा आत्मविश्वास मिळेल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवणारी व्यक्ती आयुष्यात निश्चितच यश संपादन करू शकते, असा विश्वास प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंतराव हंकारे यांनी दुधेबावी येथे व्यक्त केला.

स्थैर्य, दुधेबावी, दि. १६ : फलटण तालुक्यातील दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दुधेबावी फेस्टिव्हल अंतर्गत २६ व्या संत गाडगेबाबा व्याख्यानमालेत प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंतराव हंकारे यांचे प्रबोधन झाले. यावेळी मुलांच्या सुखासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या पालकांच्या कष्टांची जाणीव ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

हास्यविनोदातून गंभीर विषयावर भाष्य

प्रा. हंकारे यांनी आपल्या व्याख्यानाची सुरुवात मिश्कील व विनोदी शैलीत केली. श्रोत्यांच्या खळखळत्या हास्यातून त्यांनी हळूहळू आई-वडिलांचा त्याग, कौटुंबिक नात्यांचे महत्त्व आणि वाढत्या व्यसनाधीनतेसारख्या गंभीर विषयांकडे लक्ष वेधले. तरुणाईला व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी समाजप्रबोधनाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ शैक्षणिक यश नव्हे, तर मुलांच्या आदर्श वर्तनामुळे पालकांना समाजात ताठ मानेने जगता आले पाहिजे, असा विचार त्यांनी मांडला.

आई-वडिलांच्या अस्तित्वाचे महत्त्व

ज्यांच्या डोक्यावर पालकांचे छत्र नसते, त्यांना त्या आधाराची खरी किंमत कळते, असे भावनिक आवाहन प्रा. हंकारे यांनी केले. आई-वडिलांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करून त्यांना जिवंतपणीच आनंद देणे हे मुलांचे कर्तव्य आहे. त्यांचा संघर्ष समजून घेतल्यास तरुण कधीही चुकीच्या मार्गाला जाणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात अर्जुनतात्या काळे यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार आणि उपअभियंता वैभव ढोक यांना राज्यस्तरीय अभियंता रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!