फलटण बाजार समितीत कांद्याला ५ हजारांचा उच्चांकी दर; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात कांद्याच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळाली असून, प्रति क्विंटल कमाल ५ हजार रुपये इतका दर मिळाला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०३ नोव्हेंबर : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात मंगळवारी कांद्याचे दर तेजीत राहिले असून, कांद्याला कमाल ५ हजार रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी भाव मिळाला आहे. बाजारात कांद्याची मोठी आवक झाली असतानाही दरातील तेजी कायम राहिल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

आवक आणि दराची सविस्तर आकडेवारी

बाजार समितीच्या अधिकृत आकडेवारीनुसार, मुख्य बाजारात एकूण १ हजार ४९० क्विंटल म्हणजेच २ हजार ९८० पिशव्या कांद्याची आवक नोंदवली गेली. यामध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याला कमाल ५ हजार रुपये, तर सामान्य प्रतीच्या कांद्याला किमान २ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. बाजारातील कांद्याचा सरासरी दर ३ हजार रुपये प्रति क्विंटल इतका राहिला आहे.

शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने फलटण मार्केट यार्डात शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची मोठी लगबग पाहायला मिळाली. दर्जेदार मालाला अपेक्षित दर मिळाल्यामुळे बळीराजाने समाधान व्यक्त केले असून, पुढील काही दिवस ही तेजी कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!