
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा

स्थैर्य, फलटण : फलटण मेडिकल फौंडेशन संचलित येथील ब्लड बँकेत सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे, तरी फलटण शहर व तालुक्यातील रक्तदात्यांनी रक्तदान करुन सहकार्य करावे असे आवाहन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. बिपीन शहा यांनी केले आहे. फलटण ब्लड बँकेत दररोज सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत रक्त स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली असून आपल्या सोईनुसार वरील वेळेत येऊन रक्तदान करावे, अशी विनंती ब्लड बँकेच्यावतीने करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी डॉ. बिपीन शहा यांच्याशी 9850501980 या क्रमांकावर संपर्काचे आवाहन करण्यात आले आहे.



