
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटणमधील १३ सप्टेंबरचा आठवडी बाजार गिरवी नाका ते शासकीय विश्रामगृह, बीएसएनएल ऑफिस रोड व कामगार वसाहत परिसरात भरणार आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १० सप्टेंबर : गणेशोत्सवामुळे शहरात गणेशमूर्ती खरेदीसाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन रविवार, दि. १३ सप्टेंबर रोजीचा आठवडी बाजार नेहमीच्या ठिकाणाऐवजी गिरवी नाका ते शासकीय विश्रामगृह, बीएसएनएल ऑफिस रोड आणि कामगार वसाहत परिसरात भरविण्यात येणार असल्याची माहिती फलटण नगरपरिषदेने दिली आहे.
गणेशमूर्ती विक्रीसाठी ठराविक जागा
सोमवार, दि. १४ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव साजरा होत असल्याने शहरातील गणेशमूर्ती विक्रीसाठी रविवार, दि. १३ सप्टेंबरपासून महात्मा फुले चौक ते माळजाई मंदिर गेटपर्यंत मुधोजी क्लबकडील बाजूस स्टॉल उभारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या परिसरात गणेशमूर्ती खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
भाजी विक्रेत्यांनी बदलाची नोंद घ्यावी
त्यामुळे १३ सप्टेंबरचा आठवडी बाजार गिरवी नाका ते शासकीय विश्रामगृह ते बीएसएनएल ऑफिस रोड, कामगार वसाहत या परिसरात भरविण्यात येणार आहे. फलटण शहरासह परिसरातील सर्व भाजी विक्रेत्यांनी या बदलाची नोंद घेऊन नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केले आहे.