खासदार रणजितसिंह यांच्याकडून उद्या फलटण तालुका आढावा बैठकीचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ५ मे २०२३ | फलटण |
महसूल विभाग तसेच शैक्षणिक व इतर विभागातील शेतकर्‍यांसह विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेत त्या जागेवरच सोडवण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे आढावा बैठक आयोजित केली असून सर्वांनी आपल्या तक्रारी व अडचणींचा निपटारा करण्यासाठी शनिवार, दि. ६ मे रोजी सर्व कागदपत्रांसह तहसील कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन प्रदेश कार्यकारिणी सदस्य जयकुमार शिंदे यांनी केले आहे.

दरम्यान, गेली अनेक वर्षे महसूल विभागाकडून शेतकर्‍यांना विनाकारण सहज होणार्‍या कामांसुध्दा हेलपाटे मारायला लावले असल्याच्या अनेक तक्रारी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे शेतकर्‍यांनी लेखी व तोंडी केल्या होत्या, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे फलटण तालुक्यातील सर्व नायब तहसिलदार, सर्व मंडल अधिकारी व तलाठी यांना या आढावा बैठकीत हजर राहण्याचे आदेश तहसीलदार समीर यादव यांनी काढले असून जे हजर राहणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार झालेपासून विविध विभागांच्या अधिकाधिक अडचणी सोडविल्या असून सध्या केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ अशी सवय असलेल्या महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी अनागोंदी कारभार सुरू केला आहे. शेतकरी अनेक लाभांपासून वंचित राहतात, तसेच शैक्षणिक क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांना कागदपत्रे सादर करणे गरजेचे असते. मात्र, त्यांना वेळेत ती उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थी फीसह अनेक गोष्टींपासून वंचित राहतात. त्यामुळे शेतकरी व विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी खासदार रणजितसिंह स्वतः आढावा घेऊन त्या गोष्टी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी सर्व शेतकरी व विद्यार्थ्यांनी या आढावा बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.


Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!