फलटण तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; तरडगाव आणि गिरवी मंडळात सर्वाधिक पाऊस


तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्याकडून आकडेवारी जाहीर; तालुक्यात सरासरी ७.९ मि.मी. पावसाची नोंद

स्थैर्य, फलटण, दि. ४ जून : फलटण तालुक्यात गेल्या दोन दिवसांत मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसाची अधिकृत आकडेवारी तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी प्रसिद्ध केली असून, तालुक्यात आतापर्यंत सरासरी ७.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये तरडगाव आणि गिरवी महसूल मंडळात (सर्कल) सर्वाधिक पाऊस बरसला आहे.

तरडगाव आणि गिरवीत सर्वाधिक पाऊस

कृषी विभागाने ३ जून २०२६ रोजीच्या अहवालानुसार जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, तालुक्यात एकूण पावसाची सरासरी ८४.७ टक्के (७.९ मि.मी.) इतकी झाली आहे. तरडगाव मंडळात सर्वाधिक २०.८ मि.मी., तर त्याखालोखाल गिरवी मंडळात १८.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. फलटण शहर (मंडळ) परिसरात मात्र पावसाने हुलकावणी दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे (०.० मि.मी.).

मंडळनिहाय झालेला एकूण पाऊस (मि.मी. मध्ये) खालीलप्रमाणे:

  • तरडगाव: २०.८ मि.मी.

  • गिरवी: १८.५ मि.मी.

  • आदर्की: ७.० मि.मी.

  • बरड: ६.५ मि.मी.

  • राजळे: ६.५ मि.मी.

  • आसू: ६.३ मि.मी.

  • होळ: ३.८ मि.मी.

  • कोळकी: ०.८ मि.मी.

  • वाठार: ०.८ मि.मी.

  • फलटण: ०.० मि.मी.

एकूण तालुका सरासरी पाऊस: ७.९ मि.मी.

या मान्सूनपूर्व पावसामुळे प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, तालुक्यातील बळीराजा आता खरिपाच्या पेरणीसाठी मुख्य मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे.


Back to top button
Don`t copy text!