लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला फलटण तालुका ओबीसी संघर्ष समितीचा पाठिंबा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २१ जून २०२४ | फलटण |
ओबीसी कोट्यातून मराठा समाजासाठी आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले असताना लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देण्यासाठी ओबीसी आरक्षण बचाव उपोषण वडीगोद्री येथे सुरू केले आहे.

लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या या उपोषणाला फलटण तालुका ओबीसी संघर्ष समितीने आज वडीगोद्री येथे उपोषणस्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. यावेळी ओबीसी संघर्ष समितीचे फलटण तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!