फलटण: एसटी बसच्या धडकेत पथदिवा कोसळला – मोठा अनर्थ टळला

फलटण बस स्थानकाबाहेर एसटी बसच्या धडकेत पथदिवा कोसळला. सुदैवाने इतर वाहने वेळीच थांबल्याने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला.

स्थैर्य, फलटण, दि. 20 जुलै : फलटण बस स्थानकासमोरून बाहेर पडणाऱ्या स्वारगेट आगाराच्या एसटी बसने जोराची धडक दिल्याने एक पथदिवा कोसळला. बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडला असला तरी, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

स्वारगेटवरून म्हसवडला जाणारी एसटी बस (एमएच बीटी ४२४८) फलटण आगारातून बाहेर पडत होती. यावेळी चालकाला खांब न दिसल्याने बसची ड्रायव्हर बाजूच्या पथदिव्याला जोरदार धडक बसली. या धडकेमुळे शहराची शोभा वाढवण्यासाठी लावलेला हा पथदिवा जागीच खाली कोसळला.

या घटनेदरम्यान नाना पाटील चौकाकडून येणारी वाहने प्रसंगावधान राखून जाग्यावरच थांबली. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते हरीश काकडे यांनी दिली.

Back to top button
Don`t copy text!