फलटण: नवनीत पेटकर यांचे हृदयविकाराने निधन

फलटणमधील काका क्लासेस पेटकर यांचे धाकटे चिरंजीव नवनीत नारायण पेटकर यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २० जुलै : फलटणमधील प्रसिद्ध काका क्लासेस पेटकर यांचे धाकटे चिरंजीव नवनीत नारायण पेटकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शिक्षण क्षेत्रासह फलटण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवनीत पेटकर यांना १८ जुलै रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

पेटकर कुटुंबाच्या काका क्लासेसच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण क्षेत्रात आणि सामाजिक वर्तुळात आपली ओळख निर्माण केली होती. नवनीत यांच्या अचानक जाण्याने पेटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, फलटण शहरातील नागरिक, व्यावसायिक आणि मित्र परिवाराकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

Back to top button
Don`t copy text!