फलटण : वैद्यकीय मदत कक्षाचा होणार विस्तार – मंगेश चिवटे यांची भेट

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

मंगेश चिवटे यांनी फलटणमध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा विस्तार आणि डायलिसिस मशीन वाढवण्यावर सविस्तर चर्चा झाली.

स्थैर्य, फलटण, दि. 14 जून : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी फलटण येथे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान सातारा जिल्हा आणि फलटण तालुक्यात वैद्यकीय मदत कक्ष अधिक मोठ्या प्रमाणावर आणि प्रभावीपणे राबवण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

आरोग्य शिबिरांचे नियोजन

या चर्चेत प्रामुख्याने बालकांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया आणि जयपूर फूट बसवण्यासंबंधी शिबिरे आयोजित करण्यावर विचारविनिमय करण्यात आला. या शिबिरांच्या माध्यमातून तळागाळातील गरजू रुग्णांना थेट वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

डायलिसिस सुविधा वाढवण्यावर भर

फलटण येथील आरोग्य मंडळ संचालित लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये सध्या आठ डायलिसिस मशीन्स उपलब्ध आहेत. रुग्णांची वाढती गरज लक्षात घेता या मशीन्सची संख्या वाढवण्याबाबतही या भेटीत सकारात्मक चर्चा झाली.

या महत्त्वपूर्ण भेटीच्या वेळी हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे आणि डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य उपस्थित होते. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी मंगेश चिवटे आणि युवराज काकडे यांचा यथोचित सत्कार केला.

Back to top button
Don`t copy text!