फलटण | सौ. प्रतिभा चेतन शिंदे यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघ प्रमुख पदी निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 17 जुलै 2024 | फलटण | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघ प्रमुख म्हणून निवड झाली आहे. निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले आहे. फलटण तालुक्यासह विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावामध्ये शरदचंद्र पवार यांचे विचार तळागळात पोहचवायचे आहे; असे मत यावेळी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, जिल्हा प्रवक्ते शंभूराज खलाटे, अल्पसंख्यांक सेल जिल्हा अध्यक्ष शफिकभाई शेख, फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते अशोकशेठ सस्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सौ. प्रतिभा चेतन शिंदे यांची विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ नेते स्व. सुभाष शिंदे यांच्या गटामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.


Back to top button
Don`t copy text!