
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 17 जुलै 2024 | फलटण | फलटण तालुका सहकारी दूध संघाची जमीन विक्री करण्याची टेंडर नोटीस काही दिवसांपूर्वी प्रकाशित करण्यात आली आहे. सहकारी दूध संघाची जमीन विक्री करून नक्की सत्ताधारी मंडळींना ही जमीन स्वतःच्या कंपनीसाठी घ्यायची असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. सहकारी दूध संस्थेची जमीन विक्री न होवू देण्याबाबत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली उद्या गुरुवार दि. 18 जुलै रोजी सकाळी ठीक 11 वाजून 30 मिनिटांनी मोर्चा काढणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे फलटण शहराध्यक्ष अनुप शहा यांनी दिली.
