व्यापार्‍याला जीवे मारण्याची सुपारी घेऊन दरोडा टाकणारी सराईत टोळी फलटण पोलिसांकडून ६ तासात जेरबंद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ३ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
फलटण शहरातील सेंट व्यापार्‍याला जीवे मारण्याची सुपारी घेऊन त्याचा पाठलाग करून दरोडा टाकणारी सराईत टोळी फलटण शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सहा तासांत जेरबंद केली आहे. पोलिसांनी टोळीतील सहा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सुमारे ३,२५,०००/- रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दि. ११ ऑटोबर २०२३ रोजी रात्री ९.१५ वाजता या घटनेतील फिर्यादी व्यापारी हे बोरावकेवस्ती (ता. फलटण) येथे पोहोचले असता त्यांच्या पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या एका व्यतीने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोयात मारल्याने ते गाडीवरून खाली पडले. त्यानंतर दुसर्‍या दोन मोटारसायकलवरील चार व पहिल्या मोटारसायकल असलेल्या दोन अनोळखी अशा सहा अनोळखी व्यतींनी मिळून जबरी चोरी करण्याच्या हेतूने फिर्यादीस जबर मारहाण करून जखमी केले. त्यानंतर फिर्यादीच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन व अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी व मोबाईल फोन असे जबरीने काढून घेतले. हा गुन्हा १८ ऑटोबर रोजी फलटण शहर पोलिसात दाखल करण्यात आला होता.

गुन्हा घडल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे परीतोष दातीर व गुन्हे प्रकटीकरण पथक हे तात्काळ जाऊन त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता सदरचे आरोपी हे पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत आरोपी यांनीच सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याप्रमाणे आरोपींचा कौशल्यपूर्ण तपास करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपास केला असता यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. या ६ आरोपींना पोलिसांनी अटक करून चोरीस गेलेला एकूण मुद्देमाल ३,२५,०००/- पोलिसांनी हस्तगत केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक परीतोष दातार करत आहेत.

ही कामगिरी फलटण शहरचे पोलीस उपनिरीक्षक परीतोष दातीर, पोलीस उपनिरीक्षक सूरज शिंदे, पो.ह. वाडकर, धापते, धायगुडे, फाळके, जगताप, काळुखे, सजगणे, यादव, भिसे, पो.कॉ. नाळे, पाटोळे, कर्णे, अवघडे, खराडे, टिके, जगदाळे, घोरपडे, देशमुख, जगदाळे यांनी केली आहे.


Back to top button
Don`t copy text!