
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण तालुक्यातील निंबळक येथे राजे गटाला मोठा धक्का बसला आहे. ग्रामपंचायत सदस्य समीर गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राम निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपात जाहीर प्रवेश केला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १६ ऑक्टोबर : फलटण तालुक्यातील निंबळक येथे राजे गटाला मोठा धक्का बसला आहे. ग्रामपंचायत सदस्य समीर गायकवाड आणि त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांनी बांधकाम व्यावसायिक राम निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या पक्षप्रवेशावेळी पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे पाटील, उद्योजक रामसाहेब निंबाळकर, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर, विश्वराज नाईक निंबाळकर, सुरेंद्रसिंह नाईक निंबाळकर, शिवाजी पिसाळ, संजय कापसे, संदीप बुधनवर, बाळासाहेब रिटे आणि किरण जाधव उपस्थित होते.
भाजपामध्ये सामिल झालेले प्रमुख कार्यकर्ते
राजे गटातून भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये राजेंद्र कापसे, संदीप शिंदे, प्रशांत गायकवाड, वैभव गायकवाड, अभीजीत निकम, प्रकाश निकम, शिवराज निकम, सत्यजीत यादव, रोहित पवार, संदीप जगदाळे, शंभुराज पिसाळ, लखन पवार, रोहन सांळुंखे, निखील पिसाळ, यश पिसाळ आणि शंकर मुळीक यांचा समावेश आहे.
या नव्या प्रवेशामुळे निंबळक परिसरातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.





