फलटण: नाईकबोमवाडीत व्याख्यान व सामाजिक उपक्रम; उत्साहात आयोजन


नाईकबोमवाडी येथे वेताळ बाबा यात्रा व शिवजयंतीनिमित्त व्याख्यान, राजमुद्रा वाटप आणि सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडले.

स्थैर्य, फलटण, दि. २९ एप्रिल : फलटण तालुक्यातील नाईकबोमवाडी येथे वेताळ बाबा यात्रेनिमित्त आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त व्याख्यान व विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था आणि जय शिवाजी युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात ह.भ.प. रविकुमार ठावरे-पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तसेच संस्थेच्या वतीने उपस्थितांना राजमुद्रा (शिवमुद्रा) बंधन वाटप करण्यात आले.

याशिवाय पाणी वाटप, बिस्कीट व अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या वैशाली संदीप कांबळे आणि पंचायत समिती सदस्या विजया हनुमंत सोनवलकर यांची उपस्थिती होती. तसेच अजय चव्हाण, धीरज चव्हाण, गणेश चव्हाण, रणजीत घाडगे, सौरभ पवार, दयानंद घाडगे, शुभम चव्हाण, रोहन ढमाळ यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आयोजनात संस्थेच्या अध्यक्ष रझिया शेख, इम्रान सिकंदर सय्यद, उपाध्यक्ष अतुल शाह, खजिनदार कैफ शेख आणि सचिव मारुती टकले यांनी पुढाकार घेतला. तसेच संचालक, संचालिका व सभासदांनी सहकार्य केले.

कार्यक्रम उत्साहात पार पडला असून सर्वांच्या सहकार्याने उपक्रम यशस्वी झाला.


Back to top button
Don`t copy text!