फलटण पालिका मागासवर्गीय कल्याणकारी समिती सभेत सर्व विषय मंजूर; सभापती सौ. सुपर्णा अहिवळे यांची माहिती

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण नगरपरिषदेच्या मागासवर्गीय दुर्बल व कल्याणकारी समितीच्या सभेत सर्व विषय एकमताने मंजूर झाले. उपस्थितांची नावे व विकासकामांचा तपशील जाणून घ्या.

स्थैर्य, फलटण, दि. 27 नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मागासवर्गीय दुर्बल व कल्याणकारी समितीची सभा सभापती सौ. सुपर्णा सनी अहिवळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती सभापती सौ. अहिवळे यांनी दिली. या सभेसाठी समिती सदस्य तथा नगरसेविका सौ. अस्मिता भीमराव लोंढे, सौ. मिना जीवन काकडे, सौ. कांचन दत्तराज व्हटकर, सौ. सुलक्षणा जितेंद्र सरगर, सौ. रुपाली सूरज जाधव आणि सौ. कविता श्रीराम मदने उपस्थित होत्या.

सभेतील विषय आणि विकासकामे

सभेच्या कार्यपत्रिकेनुसार फलटण नगरपरिषद हद्दीतील मागासवर्गीय दुर्बल घटकातील महिलांकरिता कार्यक्रम आयोजित करण्याबाबत विचार करून निर्णय घेण्यात आला. तसेच प्रभाग क्र. २ मधील नगरपरिषद शाळा क्र. ३ ची सुरक्षा भिंत बांधणे व इतर आवश्यक बाबी सुधारणा व दुरुस्ती करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. याशिवाय प्रभाग क्र. २ मधील मागासवर्गीय दुर्बल घटकासाठी चेंबर बांधणे, दुरुस्ती करणे व नवीन झाकण बसविणे, सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरुस्ती व पाण्याची व्यवस्था करणे, गटार बांधणे व दुरुस्ती करणे, बौद्ध विहाराचे काम व दुरुस्ती करणे, वाचनालयाची दुरुस्ती (छताची कामे, रंगकाम, स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फर्निचर, पंखे बसवणे) आणि सार्वजनिक नादुरुस्त पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नवीन टाकणे या कामांवर विचार करून सदरील विकासकामे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रभाग क्र. ३ व ५ मधील कामे आणि प्रतिक्रिया

फलटण नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र. ३ मध्ये गटार व चेंबर बांधणे, दुरुस्ती करणे व सार्वजनिक नादुरुस्त पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नवीन टाकणे तसेच प्रभाग क्र. ५ मध्ये गटार व चेंबर बांधणे व दुरुस्ती करणे या विषयांवरही निर्णय घेण्यात आला. सभापती सौ. सुपर्णा सनी अहिवळे म्हणाल्या की, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील व नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहराचा सर्वांगीण विकास होत असून, त्याचाच भाग म्हणून मागासवर्गीय वस्तीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी समिती कटिबद्ध आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!