फलटण पालिकेचा आखाडा : राजे गट (शिवसेना) विरुद्ध महायुती (खासदार गट); वाचा प्रभाग निहाय लढती

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. १८ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर दोन्ही प्रमुख गटांनी आपापल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. खासदार गटाने (महायुती) प्रामुख्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हांवर उमेदवार दिले आहेत, तर राजे गटाने शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर लढण्याचे ठरवले आहे. यामुळे आता प्रत्येक प्रभागातील थेट लढती स्पष्ट झाल्या आहेत.

राजे गटाच्या यादीत काही उमेदवार ‘आघाडी’ म्हणून, तर खासदार गटाच्या यादीत प्रभाग १ मध्ये उमेदवार ‘अपक्ष’ म्हणून लढत आहेत.

दोन्ही गटांची प्रभागनिहाय अधिकृत उमेदवार यादी खालीलप्रमाणे:

प्रभागराजे गट (शिवसेना / आघाडी)महायुती (खासदार गट)
१ अआवळे लक्षमी प्रमोदसौ. अस्मिता भीमराव लोंढे / सौ. नर्मदा किसन पवार
१ बपवार सुमन रमेशसोमाशेठ गंगाराम जाधव / देविदास किसन पवार
२ अरणदिवे आरती जयकुमारमीना जीवन काकडे (राष्ट्रवादी)
२ बअहिवळे अनिकेत राहुलसौ. सुपर्णा सनी अहिवळे (राष्ट्रवादी)
३ अभोसले पूनम सुनीलसचिन रमेश अहिवळे (राष्ट्रवादी)
३ बननावरे सुषमा हेमंतसौ. सुलक्षणा जितेंद्र सरगर
४ अजाधव रुपाली सुरजसौ. हेमलता चंद्रकात नाईक (राष्ट्रवादी)
४ बपप्पू शेखराहुल जगन्नाथ निंबाळकर
५ अव्हटकर सुरेखा श्रीकांतसौ. कांचन दत्तराज व्हटकर
५ बपाटील विजय हरिभाऊरोहित राजेंद्र नागटिळे
६ अकुंभार दीपक अशोककिरण देवदास राऊत
६ बजगदाळे अमिता सदाशिवमंगलादेवी पृथ्वीराज नाईक निंबाळकर
७ अकर्णे श्रीदेवी गणेशसौ. स्वाती राजेंद्र भोसले
७ बगुंजवटे पांडुरंग मानसिंगरावअशोक जयवंत जाधव
८ अतेली विशाल उदयफिरोज शहनवाज आत्तार
८ बखानविलकर सुवर्णा अमरसिंहकु. सिद्धाली अनुप शहा
९ अमदने कविता श्रीराम (आघाडी)रजिया मेहबूब मेटकरी (राष्ट्रवादी)
९ बपवार पंकज चंद्रकांत (आघाडी)अमोल प्रकाश भोईटे (राष्ट्रवादी)
१० अतारळकर श्वेता किशोरसौ. रेहाना अमीर मोमीन
१० बपवार विशाल पांडुरंग (आघाडी)अमित अशोक भोईटे
११ अचोरमले कृष्णात मल्हारी (दादासाहेब)संदीप दौलतराव चोरमले
११ बनिकम प्रियांका युवराजसौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले
१२ अकाकडे विलास वसंतरावअरुण हरिभाऊ खरात
१२ बशहा स्मिता संगमसौ. हेमंत फुले
१३ अबागवान सानिया फिरोज (आघाडी)मोहिनी मंगेश हेंद्रे
१३ बकाकडे निर्मला शशिकांत (आघाडी)रुपाली अमोल सस्ते
१३ कसूर्यवंशी (बेडके) सचिन सुभाषराव (आघाडी)राहुल अशोक निंबाळकर (राष्ट्रवादी)

या अधिकृत याद्या जाहीर झाल्याने आता प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी आज (दि. १८) होत असून, त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतरच प्रत्येक प्रभागातील थेट लढतींचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. मात्र, या प्रमुख याद्यांमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून, दोन्ही गटांनी आपापल्या विजयाचा दावा केला आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!