
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण, दि. ०२ : फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी नुकतीच कोरोना बाबतची चाचणी केलेली आहे व त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल हा पॉझिटीव्ह आलेला आहे. तरी मी घरीच होम क्वारंटाइन मध्ये उपचार घेत असून माझी प्रकृती उत्तम आहे. दरम्यान गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना टेस्ट करुन घ्यावी, स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार दीपक चव्हाण यांनी केलेले आहे.
