
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २७ जुलै २०२४ | फलटण |
फलटण वकील संघाच्या २०२४-२५ च्या कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया पार पडली असून अध्यक्षपदी अॅड. बापूसाहेब बाबा सरक, तर उपाध्यक्षपदी अॅड. मयूरी चैतन्य शहा यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यकारिणीची सचिवपदी अॅड. सूरज सर्जेराव सोनवलकर, सहसचिवपदी अॅड. विशाल भगवान मोहिते, खजिनदारपदी अॅड. प्रशांत प्रल्हाद साठे, सदस्यपदी अॅड. अनिल नारायण कुंभार, अॅड. आर. ए. यादव, अॅड. मयूर नामदेव भोसले, अॅड. जी. व्ही. तावरे यांची निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. आर. ए. सतुटे यांनी काम पाहिले.
