फलटणकरांच्या सेवेत “चंदुकाका सराफ” दाखल; आमदार दीपक चव्हाण व माजी खासदार रणजितसिंह यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 28 जुलै 2024 | फलटण | सोन्यातील १८२७ पासूनची परंपरा, शुद्धता, विश्वास, पारदर्शकता, नाविन्यता आता फलटणला मिळणार आहे. परंपरा, शुद्धता, विश्वास, पारदर्शकता, नाविन्यता या पंचसूत्रावर आधारित विश्वास संपादन केलेली, संपूर्ण महाराष्ट्रात १९८ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेली ‘चंदुकाका सराफ’ ही सुवर्णपेढी आता आपल्या सेवेसाठी फलटणमध्ये दाखल झाली आहे. या शुभारंभाच्या क्षणात आज दिवसभरात सर्वांनी सहभागी व्हावे आणि शुद्ध व कलात्मक दागिन्यांची श्रृंखला पाहावी, असे आवाहन ‘चंदुकाका सराफ’ सुवर्णपेढीतर्फे करण्यात आले आहे.

बारामतीची प्रसिद्ध सुवर्णपेढी म्हणजेच चंदुकाका सराफ अँड सन्स हे आज पासून फलटणकरांच्या सेवेमध्ये रुजू झाले आहेत. त्यांचे फलटण येथील दालन फलटण शिंगणापूर रोडवरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक (पृथ्वी चौक) येथे आजपासून कार्यान्वित झाले आहे.

या दालनाचे उद्घाटन आमदार दीपक चव्हाण, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. निता मिलिंद नेवसे, माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, सद्गुरु व महाराजा उद्योगसमूहाचे शिल्पकार दिलीपसिंह भोसले, सौ. वैशाली कृष्णात चोरमले यांच्यासह मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

पाच दिवस पाच ‘ज्युपिटर’ स्कूटर जिंकण्याची सुवर्णसंधी…

दरम्यान, फलटणमधील या शुभारंभानिमित्त ‘चंदुकाका सराफ’ सुवर्णपेढीतर्फे पाच दिवस पाच ‘ज्युपिटर स्कूटर’ जिंकण्याची सुवर्णसंधी ठेवण्यात आली आहे. रु.२०,००० पासून पुढील खरेदीवर व रु. ३,००० व पुढील गुंतवणुकीवर १ ज्युपिटर जिंकता येणार आहे. ही ऑफर कालावधी २८ जुलै २०२४ ते १ ऑगस्ट २०२४ पर्यंतच ठेवण्यात आली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!