
समर्थ प्रतिष्ठानचे गणेश भोईटे व रमण भोईटे यांनी राजे गटाला सोडचिठ्ठी देत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
स्थैर्य, फलटण, दि. १५ जुलै : फलटण येथील समर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश भोईटे आणि सामाजिक कार्यकर्ते रमण भोईटे यांनी राजे गटाची साथ सोडत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडला.
या पक्षप्रवेशावेळी फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, स्वराज पतसंस्थेचे अध्यक्ष अमरसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नगरसेवक अशोकराव जाधव, नगरसेवक संदीप चोरमले, नगरसेवक सचिन अहिवळे आणि ज्येष्ठ नेते भीमदेव बुरुंगले यांची प्रमुख उपस्थिती होती.
गणेश भोईटे आणि रमण भोईटे यांच्या भाजप प्रवेशामुळे फलटणच्या स्थानिक राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड मानली जात आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपची ताकद यामुळे शहर आणि तालुक्यात आणखी वाढल्याचे मानले जात आहे.