फलटण | शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर; खासदार मोहिते – पाटलांचा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 27 ऑगस्ट 2024 | फलटण | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातील फलटण तालुक्यामध्ये असणारी गटबाजी चव्हाट्यावर आली असून माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते – पाटील यांचा आयोजित कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षावर आलेली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की; काल माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम फलटण येथील ज्येष्ठ नेते स्व. सुभाष शिंदे यांच्या “जिद्द” या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेला होता. त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयत्यावेळी रद्द झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील गटबाजी ही चव्हाट्यावर आली असल्याची चर्चा सुरू आहे. खासदार मोहिते – पाटील यांचा कार्यक्रम रद्द होण्यामागचा कारण अद्याप समोर आले नसले तरी सुद्धा कार्यक्रम रद्द झाल्यामुळे मोठी नामुष्की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षावर आली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!