फलटणच्या पोलीस उपअधीक्षकपदी धन्यकुमार गोडसे

फलटणचे नवनियुक्त पोलीस उपअधीक्षक म्हणून धन्यकुमार गोडसे यांची नियुक्ती झाली आहे. विशाल खांबे यांची मुदतपूर्व बदली झाली असून गोडसे तात्काळ पदभार स्वीकारणार आहेत.

स्थैर्य, फलटण, दि. २३ जून : फलटणच्या पोलीस उपअधीक्षकपदी धन्यकुमार गोडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान पोलीस उपअधीक्षक विशाल खांबे यांची मुदतपूर्व बदली झाली असून, धन्यकुमार गोडसे या नवीन पदाचा तात्काळ पदभार स्वीकारणार आहेत.

धन्यकुमार गोडसे यांना फलटणच्या भौगोलिक आणि कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीची चांगली जाण आहे. यापूर्वी त्यांनी फलटण येथे पोलीस निरीक्षक म्हणून कामकाज पाहिले आहे. त्यांच्या या प्रशासकीय अनुभवाचा फलटण विभागातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.

दुसरीकडे, फलटणचे मावळते पोलीस उपअधीक्षक विशाल खांबे यांची मुदत संपण्यापूर्वीच बदली करण्यात आली आहे. विशाल खांबे हे सध्या पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे पदोन्नती मिळेपर्यंत त्यांच्या नवीन नियुक्तीचे आदेश प्रलंबित आहेत.

Back to top button
Don`t copy text!