सातारा जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक रणजितदादांचा आदर्शवत पुढाकार! अवयवदानाचा घेतला निर्णय ‘आपली फलटण मॅरेथॉन’मध्ये केले नागरिकांना आवाहन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ऑनलाईन फॉर्म भरून अवयवदानाचा संकल्प केला असून, नागरिकांनाही या उदात्त कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २५ ऑक्टोबर : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक तथा माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी समाजासमोर एक मोठा आदर्श प्रस्थापित केला आहे. त्यांनी स्वतःच्या अवयवदानाचा फॉर्म ऑनलाईन भरून अधिकृत नोंदणी केली असून, नागरिकांनीही या उदात्त कार्यात सहभाग घेत अवयवदान करावे, असे जाहीर आवाहन त्यांनी केले आहे.

जोशी हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आपली फलटण मॅरेथॉन’ स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी अवयवदानाचे महत्त्व आणि गरज स्पष्ट केली. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांना कसे जीवदान मिळू शकते, याची माहिती देत त्यांनी स्वतः ऑनलाईन फॉर्म भरून अवयवदानाचा संकल्प केल्याचे जाहीर केले व इतरांनाही यासाठी प्रेरित केले.

या प्रेरणादायी कार्यक्रमाच्या वेळी मंचावर जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य संचालक तथा फलटणमधील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

नुकतेच जिल्हा बँकेवर बिनविरोध निवडून गेल्यानंतर, रणजितदादांनी घेतलेल्या या सामाजिक बांधिलकीच्या निर्णयाचे आणि त्यांच्या आवाहनाचे संपूर्ण तालुक्यातून मोठे कौतुक होत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!