सहकारी साखर कारखान्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकारकडून अभ्यासगट स्थापन; धोरणात मोठे बदल होण्याची शक्यता

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्यातील आर्थिक संकटात सापडलेल्या सहकारी साखर कारखान्यांना उभारी देण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणाचे नवे धोरण ठरवण्यासाठी राज्य सरकारने एका विशेष अभ्यासगटाची स्थापना केली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २५ ऑक्टोबर : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसमोरील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी नवी व्यवस्था उभारण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने साखर उद्योगाशी संबंधित घटकांचा समावेश असलेला एक अभ्यासगट स्थापन केला आहे. या अभ्यासगटाच्या अहवालानुसार साखर कारखान्यांच्या मदतीसाठी कायमस्वरूपी धोरणात्मक व्यवस्था तयार केली जाणार आहे.

आर्थिक संकट आणि कारखान्यांची सद्यस्थिती

साखरेच्या दरातील चढ-उतार, निर्बंध, एफआरपीमधील वाढ आणि व्यवस्थापनातील अभावामुळे मागील दोन दशकांत राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची संख्या घटली आहे. अनेक कारखाने बंद पडल्याने किंवा अवसायानात गेल्याने सध्या स्वबळावर हंगाम घेणाऱ्या सहकारी कारखान्यांची संख्या मोजकीच उरली आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी सहकार विभागाने हे पाऊल उचलले आहे.

अभ्यासगटात कोणाचा समावेश?

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडील मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्देशानुसार स्थापन केलेल्या या अभ्यासगटात सहकार आयुक्त, साखर आयुक्त, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक, तसेच विविध बँका आणि साखर संघ व संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. हा गट कारखान्यांच्या सक्षमीकरणासाठी उपाययोजना सुचवणार असून स्वतंत्र पुनरुज्जीवन आराखडा तयार करण्याचे काम याद्वारे केले जाणार आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!