फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण: तपासासाठी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. २ नोव्हेंबर : फलटण येथील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. या पथकाचे नेतृत्व आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

(दि. २३ ऑक्टोबर) रोजी फलटण येथील एका हॉटेलमध्ये पीडित महिला डॉक्टरने आत्महत्या केली होती. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी (दि. १ नोव्हेंबर) रोजी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आता या प्रकरणाचा तपास तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडे देण्यात आला आहे.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी या गुन्ह्यात पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदणे आणि प्रशांत बनकर या दोघांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!