फलटण शहर भाजपाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी, चष्मावाटप, शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २८ सप्टेंबर २०२४| फलटण |
फलटण शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मावाटप आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने करण्यात आले असल्याची माहिती युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर यांनी दिली.

वाढत्या डोळ्यांच्या आजाराबाबत सर्वसामान्यांना मोफत उपचार मिळावा, आवश्यक नेत्रतपासणी व्हावी, या उदात्त उद्देशातून फलटण शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने फलटण शहरातील १२ प्रभागात मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात नेत्र तपासणीनंतर आवश्यक असणार्‍या रुग्णांना मोफत औषधोपचार, मोफत चष्मावाटप, शस्त्रक्रिया आवश्यक असल्यास मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिराचा लाभ फलटण शहरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन शहराध्यक्ष अनुप शहा यांनी केले आहे.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येते. व्यसनमुक्ती, स्वछता अभियान, महिला सक्षमीकरण, रोजगार मेळावे आदी उपक्रमांसह आता भव्य अशा मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, असे यावेळी अनुप शहा यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!