फलटण: अजित पवार जयंतीनिमित्त सेवा सप्ताह – विविध सामाजिक उपक्रम

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सेवा सप्ताहाचे आयोजन केले. याअंतर्गत अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.

स्थैर्य, फलटण, दि. 22 जुलै : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त फलटण तालुक्यात आमदार सचिन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहाच्या माध्यमातून शहरात रक्तदान शिबिर, फळे वाटप आणि वारकऱ्यांसाठी अन्नदान यांसारखे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.

महाराजा मंगल कार्यालय येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. तसेच उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप आणि जिंती नाका परिसरातील नगरपरिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तकांचे वाटप केले. मंगळवार पेठ परिसरात वृक्षारोपण आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांना अन्नदान सेवा दिली गेली.

विकासात मोलाचे योगदान

यावेळी सचिन पाटील म्हणाले, अजित पवार यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि विकासात मोलाचे योगदान आहे. त्यांचे कार्य महाराष्ट्रातील जनता कधीही विसरणार नाही. विकासाच्या मुद्द्यावर चर्चा होईल, त्यावेळी त्यांचे स्मरण कायम राहील. त्यांच्या कार्याचा वारसा कार्यकर्ते म्हणून आम्ही सदैव पुढे चालू ठेवू.

मान्यवरांची उपस्थिती

या सेवा सप्ताहात पंचायत समिती सभापती शिवांजली भोसले, डी. के. पवार, माजी सभापती रामभाऊ ढेकळे, महिला मोर्चा अध्यक्षा प्रतिभा शिंदे आणि युवक मोर्चा अध्यक्ष अतुल शहा उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांचे नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Back to top button
Don`t copy text!