
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. मे. धनेश ट्रेडर्सच्या अडतीवर कांद्याला २७४६ रुपये इतका सर्वाधिक दर मिळाला असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 22 जुलै : फलटण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मुख्य बाजारात मंगळवारी कांद्याला २७४६ रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांकी दर मिळाला. मे. धनेश ट्रेडर्स यांच्या अडतीवर हा सर्वाधिक दर निघाला.
बाजार समितीत कांद्याची 1319 क्विंटल म्हणजेच 2638 पिशव्या इतकी आवक झाली. या आवकेला बाजारात व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून, दरात मोठी तेजी दिसून आली.
बाजार समितीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, बाजारात कांद्याला किमान 700 रुपये, तर कमाल 2746 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच, कांद्याचा सरासरी दर 1600 रुपये प्रतिक्विंटल इतका नोंदवला गेला. कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने बाजारात समाधानकारक वातावरण आहे.
