
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात ज्वारी, बाजरी आणि मकासह विविध शेतमालाची आवक वाढली असून, पिवळ्या मुगाला प्रतिक्विंटल १५ हजार रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ११ ऑक्टोबर : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात रविवारी (दि. ११) भरलेल्या लिलावात विविध शेतमालाच्या दरात वाढ नोंदवण्यात आली. बाजारात ज्वारीची ५२ क्विंटल आवक होऊन ४००० ते ८५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला, तर मक्याची २४३ क्विंटल आवक होऊन २५७५ ते २९५१ रुपये दर राहिला.
प्रमुख शेतमालाची आवक व दर
बाजारात बाजरीची १९१ क्विंटल आवक होऊन २६०० ते ४००० रुपये, गव्हाची २७२ क्विंटल आवक होऊन २७८० ते ३३५० रुपये आणि हरभऱ्याची ६८ क्विंटल आवक होऊन ७००० ते ७८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. कडधान्यांमध्ये उडीदाला ९५०० ते १००१० रुपये, हिरव्या मुगाला ७५०० ते १०००० रुपये आणि पिवळ्या मुगाला १५००० रुपयांचा उच्चतम दर मिळाला. तसेच घेवड्याची ३५ क्विंटल आवक होऊन ६१०० ते १०३०० रुपये भाव मिळाला.



