दैनिक स्थैर्य | दि. २ ऑगस्ट २०२३ | फलटण |
मांडवखडक (ता. फलटण) येथील रहिवासी तसेच आमदार डॉ. बालाजी केणीकर यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार आत्माराम ननवरे यांचे काल दु:खद निधन झाले आहे.
नंदकुमार ननवरे यांची अंत्ययात्रा आज त्यांचे मूळ गाव मांडवखडक येथून सकाळी ७.०० वाजता निघून त्यांच्यावर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ननवरे यांच्या निधनाने मांडवखडक व परिसरात त्यांचे आप्तेष्ट व मित्र परिवारावर शोककळा पसरली असून ननवरे यांच्या कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन केले आहे.