दैनिक स्थैर्य | दि. 02 ऑगस्ट 2023 | फलटण | देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी व्यक्तीमत्त्व, दैनिक ‘केसरी’ व दैनिक ‘मराठा’ या वृत्तपत्रांचे संस्थापक लोकमान्य टिळक यांना (दि.1 ऑगस्ट) पुण्यतिथीनिमित्त फलटण येथे पत्रकारांकडून अभिवादन करण्यात आले.
येथील शंकर मार्केट परिसरातील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ, बापूराव जगताप, पत्रकार यशवंत खलाटे – पाटील, प्रसन्न रुद्रभटे, रोहित वाकडे, ऋषिकेश आढाव यांच्यासह समर्थ स्वीट्सचे प्रकाश मोरे, संजय चोरमले उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांकडून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनाही जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली.