पर्युषन पर्व म्हणजे जैन समाजाचे महापर्व – श्रीमंत सुभद्राराजे ना. निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
संगिनी फोरम फलटण यांच्याकडून तपस्वींचा सत्कार करण्याचा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी केले. संगिनी फोरम व स्पेक्र्टम ई सेंटर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सर्व तपस्वींचे श्रीमंत सुभद्राराजे ना. निंबाळकर यांनी यावेळी अभिनंदन केले.

नुकत्याच संपन्न झालेल्या पर्युषन पर्वामध्ये धर्मनगरी फलटण येथील श्रावक-श्राविका, लहान मुले-मुली यांनी प. पू. अपूर्वसागरजी महाराज व प.पू. अर्पितसागरजी महाराज यांच्या सान्निध्यात अनुक्रमे ३२, १६, १०, ५ व ३ उपवास केले होते.

या सर्व तपस्वींचा सत्कार बा. ब्र. नयनभैय्या, श्रीमंत सुभद्राराजे ना. निंबाळकर, प्रकाश दोशी (वाकडमाने), राजेंद्र कोठारी, स्मिता शहा, जैन सोशलच्या अध्यक्षा सविता दोशी, संगीनी फोरम अध्यक्षा अपर्णा जैन, श्रीपाल जैन, सचिव प्रज्ञा दोशी, खजिनदार मनिषा घडिया, निना कोठारी, तुषार शहा, तेजस शहा, अर्चना गांधी यांच्या हस्ते स्मिता शहा यांच्या सौजन्याने भेटवस्तू, मोत्याची माळ व श्रीफळ देऊन करण्यात आला.

यावेळी ३२ उपवास करणारे मंगल सुरेश दोशी, आलोक सुकुमार दोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. १६ उपवास करणारे ३ तपस्वी, १० उपवास करणारे ७ तपस्वी, ५ उपवास करणारे ३१ तपस्वी, ३ उपवास करणारे २४ तपस्वी या सर्वांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सायकॉलॉजिस्ट स्मिता शहा यांचे मार्गदर्शनाखाली टि. सी. कॉलेज, बारामतीच्या विद्यार्थीनी गुणश्री रासकर, चैत्राली सुतार, सुप्रिया जावळे, निकीता भारती, मोनिका खटके यांनी ‘रंग मनाचे’ हा सुंदर कार्यक्रम सादर केला. मानसिक ताणतणाव विरहित जीवन जगण्याबाबत या कार्यक्रमातून प्रबोधन करण्यात आले. तसेच श्रीलंका येथे योगा स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल चैताली कोठारी, तृप्ती कोठारी यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरूवात किशोरी शहा, प्रज्ञा दोशी, मनिषा घडिया, जयश्री उपाध्ये यांच्या सुश्राव्य अशा मंगलाचरणाने करण्यात आली. मनीषा घडिया यांनी फेडरेशन सुत्रवाचन केले. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्ज्वलन करण्यात आले. संगिनी अध्यक्षा अपर्णा जैन यांनी प्रास्ताविकात संगिनी फोरमच्या कार्याचा आढावा सादर केला. दिप्ती राजवैद्य यांनी सुंदर असे सूत्रसंचालन केले. खजिनदार मनिषा घडिया यांनी आभार प्रदर्शन केले.


Back to top button
Don`t copy text!