हिवाळ्यात ओठ कोरडे पडतात का? ओठांचा मऊपणा टिकवण्यासाठी पारिजातकाच्या फुलांपासून बनवा नॅचरल लिप बाम

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हवेतील गारठ्यामुळे ओठ कोरडे आणि निस्तेज होण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी बाजारातील महागड्या उत्पादनांऐवजी पारिजातकाच्या फुलांपासून घरच्या घरी नैसर्गिक लिप बाम तयार करणे उत्तम ठरते.

स्थैर्य, सातारा, दि. ०३ नोव्हेंबर : हिवाळा ऋतू सुरू झाल्यानंतर वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे त्वचेसह ओठांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. ओठांवरील त्वचा अत्यंत संवेदनशील असल्याने थंडीत ती कोरडी पडते आणि फाटल्यामुळे जळजळ किंवा वेदना होऊ लागतात. ओठांचा नैसर्गिक मऊपणा कायम ठेवण्यासाठी आणि त्यांची चमक टिकवण्यासाठी पारिजातकाच्या फुलांचा प्रभावी वापर केला जाऊ शकतो.

पारिजातकाच्या फुलांचे गुणधर्म आणि फायदे

पारिजातकाच्या फुलांमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे त्वचेचे रक्षण करण्यास मदत करतात. बाजारात मिळणाऱ्या केमिकयुक्त प्रॉडक्ट्समुळे अनेकदा ओठांचे इन्फेक्शन होऊन ते काळे पडतात. याउलट, पारिजातकाच्या फुलांपासून तयार केलेले घरगुती लिप बाम ओठांना मऊ, मुलायम आणि नैसर्गिक गुलाबी ठेवण्यास उपयुक्त ठरते.

घरगुती लिप बाम बनवण्याची सोपी कृती

हे लिप बाम तयार करण्यासाठी सर्वप्रथम पारिजातकाची ताजी फुले स्वच्छ धुऊन त्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्याव्यात. या पाकळ्या खलबत्यात बारीक कुटून त्यात थोडेसे खोबरेल तेल किंवा तूप मिसळून पेस्ट तयार करावी. त्यानंतर एका छोट्या पॅनमध्ये पाणी गरम करून त्यात वाटी ठेवून वाफेवर ही पेस्ट आणि तूप ५ ते १० मिनिटे मंद आचेवर एकत्र उकळावे. तयार झालेले मिश्रण सुती कापडाने गाळून एका काचेच्या डबीत साठवावे. दररोज रात्री झोपण्याआधी हे लिप बाम ओठांवर लावल्याने उत्तम परिणाम दिसून येतो.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!