खेकताना किंवा खोकताना लघवी गळतीची समस्या; दुर्लक्ष महागात पडू शकते

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

हसताना, खोकताना किंवा जड वस्तू उचलताना लघवीचे थेंब बाहेर पडणे ही स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टिनन्सची समस्या असू शकते. या समस्येकडे दुर्लक्ष न करता वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.

स्थैर्य, सातारा, दि. 30 ऑक्टोबर : मानवी शरीरात खोकताना, हसताना किंवा शिंकताना लघवीचे काही थेंब अनावधानाने बाहेर पडण्याची समस्या आजकाल अनेकांमध्ये पाहायला मिळते. हा केवळ कमकुवत स्नायूंमुळे होणारा प्रकार नसून, यामागे पेल्विक फ्लोअरचे स्नायू कमकुवत होणे हे मुख्य कारण असते. ही समस्या महिला आणि पुरुष दोघांनाही प्रभावित करू शकते, परंतु संकोचामुळे अनेकजण यावर बोलणे टाळतात.

महिला आणि पुरुषांमधील कारणे

महिलांमध्ये गरोदरपण, बाळंतपण आणि मेनोपॉजच्या काळात होणाऱ्या बदलांमुळे पेल्विक फ्लोअरचे स्नायू ताणले जाऊन कमजोर होतात. तर पुरुषांमध्ये प्रामुख्याने प्रोस्टेटची शस्त्रक्रिया किंवा पेल्विक भागातील उपचारांनंतर ही समस्या उद्भवू शकते. याशिवाय लठ्ठपणा आणि वाढत्या वयामुळे हा त्रास अधिक बळावू शकतो.

कीगेल व्यायाम ठरेल प्रभावी

स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टिनन्सवर ‘कीगेल व्यायाम’ अत्यंत उपयुक्त ठरतो. या व्यायामामुळे लघवीचा प्रवाह नियंत्रित करणारे स्नायू बळकट होतात. मात्र, हा व्यायाम योग्य पद्धतीने करणे आवश्यक असून यासाठी फिजियोथेरपिस्ट किंवा वैद्याकीय मार्गदर्शनाखाली उपचार घेणे फायदेशीर ठरू शकते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!