लोकांचे भले करण्याचा विचार प्रत्यक्षात आणणारी माणसे कार्यरत राहिल्याने पश्चिम महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला : श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर


दैनिक स्थैर्य । दि. १८ मे २०२२ । फलटण । आपले चांगले होईलच, लोकांचे भले करु हा विचार करणारी किंबहुना तो विचार प्रत्यक्षात आणणारी माणसे प. महाराष्ट्रात कार्यरत राहिली म्हणून पश्चिम महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाल्याचे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

आ. जगन्नाथ शिंदे यांना पुरस्कार प्रदान करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, ना. बाळासाहेब पाटील शेजारी डावीकडून सुभाषराव शिंदे, आ. दीपकराव चव्हाण, आ. प्रकाश आण्णा आवाडे, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कल्लाप्पा आण्णा आवाडे वगैरे.

श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठानचे माध्यमातून दि. १४ ते २५ मे दरम्यान आयोजित स्मृती महोत्सव उदघाटन आणि श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेच्यावतीने प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्काराचे वितरण श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखालील समारंभात राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालक मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सहकार क्षेत्रातील अध्वर्यू कल्लाप्पा आण्णा आवाडे आणि केमिस्ट असोसिएशनचे मार्गदर्शक आ.जगन्नाथ शिंदे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले, त्यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. २१ हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलताना व्यासपीठावर मान्यवर.

सहकारी संस्थांना व्यावसायिकतेची जोड
यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, वसंतदादा पाटील, श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर, कल्लाप्पा आण्णा आवाडे, शरदराव पवार, दत्ताजीराव कदम अशी अनेक मोठी माणसे प. महाराष्ट्रात होती/आहेत त्यांनी आपला ठसा समाजमनावर, सामाजिक जीवनावर उमटविला, प्रगती व संपन्नतेसाठी दूरदृष्टीने काम करताना सहकार क्षेत्रातील साखर कारखाने, सुत गिरणी आणि सहकारी संस्थांना व्यावसायिकतेची जोड दिल्याचे निदर्शनास आणून देत त्यातून सहकारी साखर कारखाने, सुत गिरण्या उभ्या राहिल्या आणि त्या भागाचे विकास केंद्र बनल्या, दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून धवलक्रांती, अधिक शेती उत्पादनासाठी सुधारीत बी – बियाणे, नवे तंत्रज्ञान, सुधारित औजाराद्वारे हरित क्रांती घडल्याचे निदर्शनास आणून देत त्यामुळे प. महाराष्ट्र आरोग्य, शिक्षण, रस्ते, पिण्याचे पाणी, दळणवळणाच्या नागरी सुविधा देण्यात आघाडीवर राहिल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

या व्यक्तीमत्वांची कार्यक्षेत्रे भिन्न मात्र समाजहिताची प्रवृत्ती एकच
प. महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील असलेल्या या उत्तुंग व्यक्तीमत्वांची कार्यक्षेत्रे भिन्न असली तरी स्वतःला वाहुन घेऊन समाजहिताला प्राधान्य देत काम करण्याची वृत्ती सर्वांमध्ये एकच होती, त्यावृत्तीची कल्लाप्पा आण्णा आवाडे, आ. जगन्नाथ शिंदे, श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर, आ. श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर ही व्यक्तिमत्वे असल्याचे नमूद करीत त्यांचे प. महाराष्ट्राच्या विकासातील योगदान नव्या पिढीसमोर ठेवून त्यांना प्रेरणा, प्रोत्साहन देण्यासाठी स्मृती महोत्सव आयोजित केला जात असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आवर्जून सांगितले.

कुळ कायद्यामुळे कष्टकऱ्यांना समाधान
कुळ कायद्यामुळे कष्टकऱ्यांना स्वतःच्या जमिनीत मेहनत करता आली त्यातून प. महाराष्ट्रातील मोठे शेती क्षेत्र विकसीत झाले, त्याची उत्पादकता वाढली, कष्टकऱ्यांना समाधान लाभल्याचे निदर्शनास आणून देत अन्यथा ते हजारो एकर क्षेत्र पडीक राहिले असते याची आठवण देत आम्हा नाईक निंबाळकर कुटुंबीयांकडे १३५ हजार एकर क्षेत्र होते, श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी ते क्षेत्र मिराशी कुळांना मालकी हक्काने कायम स्वरुपी लोकांना दिल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

आवाडे कुटुंब देवदूताप्रमाणे मागे उभे राहिले
आर्थिक गर्तेत रुतलेल्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याला त्यातून बाहेर काढून ऊर्जितावस्था प्राप्त करुन देण्यात आवाडे कुटुंब देवदूताप्रमाणे मागे उभे राहिल्याने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि साखर कारखान्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ मिळणाऱ्या शेकडो कुटुंबांना दिलासा देता आ स्पष्ट करताना या प्रक्रियेतील आवाडे कुटुंब आणि जवाहरचे सहकार्य विसरता येणार नसल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले निदर्शनास आणून दिले.

प्रकल्प ग्रस्तांचा त्याग विश्वासाचे नाते दृढ करणारा
विश्वास ठेवणारी आणि ठेवलेल्या विश्वासाला साथ करणारी माणसे प. महाराष्ट्रात आहेत म्हणूनच केवळ १५ इंच पाऊस पडणाऱ्या आणि कुसळाशिवाय शिवारात अन्य काही न पिकणाऱ्या भागात, नीरा उजवा कलव्यामुळे १२७ पैकी फक्त ३४ गावे बागायती झाली, उर्वरित भाग सतत दुष्काळाशी संघर्ष करणारा अशा परिस्थितीत कृष्णेचे पाणी आणण्यासाठी नवे पाटबंधारे प्रकल्प उभारताना लाभ क्षेत्रातील आणि प्रकल्प ग्रस्त क्षेत्रातील शेतकरी ग्रामस्थांनी विश्वासाने केलेली साथ अत्यंत मोलाची आणि महत्वाची होती, २७ हजार प्रकल्प ग्रस्तांनी केलेला त्याग निश्चितच विश्वासाचे नाते दृढ करणारा असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

कोयना प्रकल्प, मंत्रालय इमारत मालोजीराजे यांनी उभारले
फलटण संस्थांनने स्वातंत्र्यपूर्व काळात येथे शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्रांच्या विकासाला प्राधान्य दिले, त्यातून येथे शताब्दी पूर्ण केलेल्या शाळा महाविद्यालयांच्या भव्य इमारती उभ्या राहिल्या आणि आजही त्या सुस्थितीत असून प्रेरणा देत आहेत, त्याचप्रमाणे श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांनी कोयना प्रकल्पाची उभारणी करुन संपूर्ण राज्याची वीजेची बहुतांश मागणी पूर्ण करण्याबरोबर सातारा, सांगली जिल्ह्यातील शेतीसाठी २६ टीएमसी पाणी कोयनेतून उपलब्ध झाल्याचे, तसेच मंत्रालय इमारत, प्रतापडावरील छ. शिवाजी महाराज यांचा आश्वारुढ पुतळा त्यांच्याच पुढाकाराने उभारला गेला असल्याचे राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.

कल्लाप्पा आण्णा आवाडे मनाने सावकार
कल्लाप्पा आण्णा आवाडे यांना त्या भागात सावकार म्हणून ओळखतात मनाने सावकार असलेल्या दादांनी आमदार, खासदार या माध्यमातून तसेच सहकारी साखर कारखाना, सहकारी बँक, सहकारी सूत गिरणी वगैरे संस्थांच्या माध्यमातून इचलकरंजी परिसरात अत्यंत उत्तम काम केले त्याचप्रमाणे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाच्या अनेक संधी त्या भागातील विद्यार्थी/विद्यार्थिनींना उपलब्ध करुन दिल्याचे सांगत ना. बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या लोकाभिमुख कामाचे कौतुक केले.

आ. जगन्नाथ शिंदे यांचे मोठे योगदान
आ. जगन्नाथ शिंदे यांनीही औषध विक्रेता संघटनेच्या माध्यमातून मजबुत संघटन उभारुन देशातील सुमारे आठ लाखाहुन अधिक औषध विक्रेते व त्यांच्या कुटुंबाना स्थैर्य प्राप्त करुन देत फार मोठे काम केल्याचे गौरवोद्गार ना. बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
आ. प्रकाश आण्णा आवाडे यांनी कल्लाप्पा आण्णा आवाडे यांच्या सहकार व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाविषयी सविस्तर विवेचन केले. आ. जगन्नाथ शिंदे यांनी संघटनेच्या प्रगतीचा धा आढावा घेत भविष्यकालीन संकल्पना विस्ताराने मांडली.

प्रारंभी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेत ही माहिती तरुण पिढीसाठी प्रेरणादायी व अनुकरणीय असल्याने स्मृती महोत्सवाच्या माध्यमातून या दोघांप्रमाणे राज्याच्या विविध भागात आणि विविध क्षेत्रात कार्यरत महान व्यक्तीमत्वांना येथे निमंत्रित करुन स्मृती पुरस्काराद्वारे त्यांचा बहुमान करताना त्यांचे समाजाप्रती असलेले योगदान नव्या पिढीसमोर ठेवण्याचा हेतू स्पष्ट केला. कल्लाप्पा आण्णा आवाडे व आ. जगन्नाथ शिंदे यांचा परिचय करुन दिला.

प्रा. डॉ. अशोक शिंदे, प्रा. नीलम देशमुख यांनी सूत्र संचालन केले. प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांनी समारोप केल्यानंतर उपस्थितांचे आभार मानले. स्वागत गीत व पसायदान संगीत शिक्षक कार्यक्रमास आ. दीपकराव चव्हाण, उत्तमराव आवाडे, सुभाषराव शिंदे, बाळासाहेब सोळसकर पाटील, जवाहरचे व्हा. चेअरमन बाबासाहेब चौगुले व संचा मंडळ, उपळेकर देवस्थान ट्रस्टच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, उपसभापती व सर्व सदस्य, जिल्हा परिषद सदस्य माणिकराव सोनवलकर, धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, बुलढाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, मालोजीराजे बँक व्हा. चेअरमन सौ. योगिनी पोकळे व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लढ्ढा, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हा. चेअरमन नितीन भोसले व संचालक मंडळ, फलटण दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार व संचालक मंडळ, शहर व तालुक्यातील औषध विक्रेते, अड. बाबुराव गावडे, अड. मिलिंद लाटकर, श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य, फलटण एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी आणि संस्थेमधील प्राचार्य, उप प्राचार्य, पर्यवेक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि फलटण व पंचक्रोशीतील नागरिक स्त्री – पुरुष, तरुणवर्ग उपस्थित होता.


Back to top button
Don`t copy text!