
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २९ डिसेंबर २०२१ । फलटण । राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते अमीर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त 31 डिसेंबर रोजी विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
अमीर शेख हे राष्ट्रीय काँग्रेसचे फलटण तालुका कार्याध्यक्ष असून फायनान्स, बचतगट, बेकायदेशीर सावकार संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष आहेत. जनतेच्या विविध प्रश्नावर त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत. वंचीत घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले असून अनेकांना खाजगी सावकार आणि फायनान्स कँपन्यांच्या जाचातून सोडविले आहे.
गोरगरिबांना वेळोवेळी मदतीसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त 31 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 3 या वेळेत बारवबाग येथे अमीरभाई शेख मित्रमंडळ बारवबाग मित्र मंडळ,फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल, हडपसर, पुणे यांच्या सहकार्याने मोफत डोळे तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर ,मोफत चष्मे वाटप कार्यक्रम होणार आहे. यासोबतच भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन देखील करण्यात आले असून रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत तसेच मोफत कोविड तपासणी आणि कोरोना लसीकरण शिबिरही यावेळी आयोजित करण्यात आलेले आहे.
फलटण येथील वृद्धाश्रमात फळे, मिठाई वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी अमीर शेख हे शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
