दैनिक स्थैर्य । दि. २३ जून २०२२ । सातारा । जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा व शासकीय तांत्रिक विद्यालय/केंद्र तथा औद्योगिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने 30 जून 2022 रोजी शासकीय तांत्रिक विद्यालय/ केंद्र तथा औद्योगिक शाळा, सातारा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक संचालक सुनिल पवार यांनी केले आहे.
रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी 02162-239938 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.