श्रीमंत रामराजेंच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त ‘फलटण मॅरेथॉन २०२३’चे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २४ एप्रिल २०२३ | फलटण |
विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजेंच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त ‘फलटण मॅरेथॉन २०२३’चे आयोजन करण्यात आले आहे. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीने या स्पर्धेचे आयोजन केले असून या स्पर्धा मंगळवार, दि. २ मे २०२३ रोजी सकाळी ६.०० वाजता मुधोजी क्लब, महात्मा फुले चौक, फलटण येथे होतील.

या स्पर्धा विविध गटात खेळविल्या जाणार असून त्या अशा : १८ वर्षांखालील मुले – ५ कि.मी., १८ वर्षांखालील मुली – ३ कि.मी., पुरूष खुला गट – १० कि.मी., महिला खुला गट – ८ कि.मी., पुरूष ४५ वर्षांपुढील – ३ कि.मी., महिला ४५ वर्षांपुढील – २ कि.मी.

या स्पर्धांसाठी प्रवेश फी २० रूपये असून नावनोंदणीची अंतिम तारीख २८ एप्रिल २०२३ आहे. नावनोंदणी केलेल्या स्पर्धकांनी प्रवेश फी जमा करून आपले चेस नंबर दि. २९ व ३० एप्रिल रोजी सकाळी ७.०० ते दुपारी १.०० या वेळेत मुधोजी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, फलटण येथून घ्यावेत.

स्पर्धेतील विजेत्यांना पुढील बक्षिसे देण्यात येतील : १८ वर्ष गट (मुले/मुली) व ४५ वर्षांपुढील पुरूष/महिला – प्रथम क्रमांक रू. ३००१/- व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक रू. २००१/- व ट्रॉफी, तृतीय क्रमांक रू. १००१/- व ट्रॉफी.

खुला गट (पुरूष व महिला) – प्रथम क्रमांक रू. ५००१/- व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक रू. ३००१/- व ट्रॉफी, तृतीय क्रमांक रू. २००१/- व ट्रॉफी.

स्पर्धेतील नावनोंदणीसाठी संपर्क : नामदेव मोरे (९९६००८२१२०), जनार्दन पवार (९२८४७६५९९५), सचिन धुमाळ (९८९०३८२२०४), राज जाधव (९२२६१३९६५३), डॉ. स्वप्निल पाटील (७७०९०११६२९), तुषार मोहिते (९४२३८८८३४४), तायाप्पा शेंडगे (९३२२७४८१९९), सूरज ढेंबरे (८८०५७७७९९८), सुहास कदम (७०८३७२०५२०).


Back to top button
Don`t copy text!