
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२२ । सातारा । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मराठा एल. आय., बी. ई.जी. आर्मड आणि ए. एस. सी. अभिलंख कार्यालयाचे आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी सातारा येथे येणार आहेत. या कोरच्या माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांचे निवृत्ती, कुटुंब निवृत्ती वेतनातील अडीअडचणी सोडविण्यासाठी दि. 26 जुलै 2022 रोजी सकाळी 10 वा. महासैनिक भवन, टी. सी. पी. सी. करंजेनाका, सातारा येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी ज्यांना निवृत्ती वेतनात काही अडीअडचणी असतील त्यांनी आपल्या निवेदनासह या मेळाव्यास उपस्थित राहून त्याचे निरसन करावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सातारा यांनी केले आहे. तसेच या दिवशी 23 वा कारगील विजय दिवसही साजरा करण्यात येणार असल्याचेही जिल्हा सैनिक कल्याण कर्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
