दैनिक स्थैर्य | दि. २० जून २०२३ | फलटण |
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, फलटण सेंटर व फलटण एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ (दि. २१ जून) फलटण येथील जोशी हॉस्पिटलचे डॉ. प्रसाद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होणार आहे.
हा योग दिवस माजी आमदार श्रीमंत विजयसिंह उर्फ शिवाजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा संकुल, श्रीमंत रामराजे शॉपिंग सेंटर पाठीमागे, फलटण येथे बुधवार, २१ जून २०२३ रोजी सकाळी ६.०० वाजता साजरा होणार आहे. या कार्यक्रमास येताना स्वत:ची सतरंजी, योग मॅट, वॉटर बॉटल आणणे आवश्यक असून सुमारे २ हजार जण येथे एकावेळी योग करू शकतील. त्यामुळे सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. किरण दंडिले, श्री. सुनील सस्ते, श्री. स्वीकार मेहता, श्री. संजय डोईफोडे, श्री. राजीव नाईक निंबाळकर यांनी केले आहे.