गिरनार इलिव्हेट समिट २३चे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०९ मे २०२३ । मुंबई । कारदेखोचे ग्रुप सीईओ अमित जैन यांनी शार्क टँकद्वारे गुंतवणूक करण्यात आलेल्या कंपन्या व अन्य कंपन्यांसाठी दोन दिवसीय गिरनार एलिव्हेट समिट २३च्या पहिल्या पर्वाचे आयोजन केले. १ आणि २ मे २०२३ या काळात जयपूर येथील मुख्यालय कार्यालयात घेण्यात आलेल्या या अशा प्रकारच्या एकमेव परिषदेतून अमित जैन ह्यांना गुंतवणूक केलेल्या कंपन्यांशी व्यक्तिगत स्तरावर जोडून घेण्यात तसेच गुंतवणूक केलेल्या कंपन्यांच्या संस्थापकांना मार्गदर्शन करण्यात असलेला सखोल रस दिसून आला.

शार्क टँकमध्ये झालेल्या निधी उभारणीनंतर ज्यांच्यात गुंतवणूक करण्यात आली त्या कंपन्यांनी मागणी केलेले सर्वांत महत्त्वाचे घटक, मेंटॉरशिप आणि त्यांचे व्यवसाय अतिवाढीच्या पथावर नेण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन हे होते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व उद्योजकांना सक्षम करण्यासाठी गिरनार इलिव्हेट समिटची संकल्पना मांडण्यात आली. विविध क्षेत्रांतील ह्या कंपन्यांसाठी विशेष सत्रे घेण्याच्या दृष्टीने परिषदेचे नियोजन करण्यात आले होते. कंपन्यांना त्यांची कक्षा विस्तारण्यासाठी तसेच अधिक उंची गाठण्याकरता आवश्यक ती कौशल्ये संपादन करण्यासाठी सक्षम करणे हे या परिषदेचे उद्दिष्ट होते.

डॉबी फूड्स, एकतारा, फनग्रो, सहाय्यता, माइशा, पीफ्लो, आद्विक फूड्स आणि ह्यांसारख्या २५हून अधिक गुंतवणूक केलेल्या व अन्य कंपन्यांनी, तज्ज्ञांकडून शिकण्याच्या व बाजारपेठेतील माहिती प्राप्त करण्याच्या उद्देशाने या उपक्रमात सहभाग घेतला.

कारदेखो ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक अमित जैन त्यांचे विचार मांडताना म्हणाले, “भारतातील स्टार्टअप परिसंस्था गेल्या काही वर्षांत विस्तृतपणे वाढली आहे. २०२२ मध्ये भारत जगभरातील स्टार्टअप्सची तिसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी परिसंस्था ठरला आहे. स्टार्टअप्समध्ये केवळ गुंतवणूक करणे त्यांच्या वाढीला चालना देण्यासाठी पुरेसे नाही असे मला ठामपणे वाटते. हे साध्य करण्यासाठी स्टार्टअप्सची जोपासना केली पाहिजे आणि त्यांना योग्य संसाधने व ज्ञानाच्या स्वरूपात पाठबळ दिले पाहिजे. स्टार्टअप्सना पाठिंबा दिल्यामुळे केवळ भरीव रोजगार संधी निर्माण होत नाहीत तर देशाच्या एकंदर अर्थव्यवस्थेला चालना देण्यात मदत होते. आमचे पहिले एलिव्हेट समिट २३ ही आमच्या दृष्टीने, गुंतवणूक केलेल्या कंपन्यांना त्यांची संसाधने प्रभावीरित्या उपयोगात आणण्यास मार्गदर्शन करण्यासाठी तसेच त्यांना अनुकूल वातावरण पुरवण्यासाठी उत्तम संधी होती.”


Back to top button
Don`t copy text!